महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर आम्हाला WHATSAPP मेसेज करा.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
प्रतिज्ञापत्र
प्रतिज्ञापत्र मी, --------------- वय. --------------- वर्षे, व्यवसाय. --------------- रा. --------------- याचेसाठी सत्यप्रतिज्ञेवर करतो/करते ते खालील प्रमाणे. प्रस्तुत दावा वादीने दावा मिळकतीबाबत वाटप, निरंतर ताकीद व दरम्यानचे उत्पन्न या साठी दाखल केलेला आहे. दावा मिळकतीपैकी वादीच्या ताब्यात दावा कलम 1 क मधील --------------- येथील भूमापन क. --------------- या घरमिळकतीपैकी काही भाग आहे. उर्वरीत दावामिळकती प्रतिवादींच्या ताब्यात आहेत. दावा मिळकतींपैकी दावा कलम 1 अही शेतमिळकत असून दावा कलम 1 क व 1 ब या मिळकती घरमिळकती व खुली जागा आहेत. प्रतिवादींच्या ताब्यात असलेल्या मिळकती या प्रतिवादी योग्य रितीने वापर करीत नाहीत. तसेच सदर मिळकतींची काळजी, देखभाल प्रतिवादी व्यवस्थीत रितीने करीत नाहित. तसेच, प्रतिवादी दावा मिळकती बेकायदेशीर रित्या त्रयस्थ व्यक्तींना हस्तांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत. या सर्वामुळे दावा मिळकतीचे नुकसान होत आहे व होत रहाणार आहे. त्यामुळे वादीच्या न्याय्य हक्कास बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे दावा मिळकती या कोर्टामार्फत कोर्ट रिसीव्हर यांच्या ताब्यात देणे व त्यांचेमार्फत दावामिळकतींची देखभाल करणे, उत्पन्न घेणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाचे नुकसान होणार नाही. दावामिळकतीच्या देखभालीसाठी वादी व प्रतिवादी यांनी त्यांच्या मालकी हिश्श्याप्रमाणे कोर्ट रिसीव्हर यांना खर्चाची रक्कम देणे व रिसीव्हरने खर्च व उत्पन्न याचा हिशोब कोर्टास देणे, उत्पन्न कोर्टात जमा करणे, जमा उत्पन्नातुन पुढील खर्च करीत जाणे न्यायाचे व गरजेचे आहे. तरी वरील कारणांसाठी कोर्ट रिसीव्हर यांची नेमणूक व्हावी, कोर्ट रिसीव्हर यांच्या प्रत्यक्ष ताब्यात सर्व दावा मिळकती प्रत्यक्ष वाटपापर्यंत देखभालीसाठी देणे, रिसीव्हर यांना जमा व खर्च यांचा हिशोब मे. कोर्टाकडे सादर करणे, उत्पन्न कोर्टात जमा करणे याबाबत व इतर तदनुषंगिक कारणांबाबत कोर्ट रिसिव्हर यांना आदेश व्हावेत, हि विनंती. येणेप्रमाणे अॅफिडेव्हिट असे. ठिकाण: दिनांक:अॅफियंट प्रतीज्ञालेख मी, --------------------------------------------- वय. --------------- वर्षे, व्यवसाय. --------------- रा. --------------- सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की, सदर अॅफिडेव्हिटमधील नमूद सर्व मजकूर माझे य्त्तम माहिती व समजुतीप्रमाणे खरा व बरोबर असून त्याचे सत्यतेसाठी मी माझी सही या खाली --------------- मुक्कामी केली आहे. ठिकाण: दिनांक:अॅफियंट मी अॅफियंट यास ओळखतो. |