विद्यमान कार्यकारी दंडाधिकारी, --------------- यांच्या समक्ष सादर
(भाडे करार नामा ११ महिने करिता)
दिनांक: -----/-----/-----
लिहून घेणार (मालक) (पार्टी क्र. १):
नाव: --------------- --------------- ---------------
पत्ता: --------------- --------------- --------------- --------------- पिन: ---------------
लिहून देणार (भाडेकरू) (पार्टी क्र. २):
नाव: --------------- --------------- ---------------
पत्ता: --------------- --------------- --------------- --------------- पिन: ---------------
इसवी सन २०२५ मध्ये हा करारनामा पार्टी क्र. १ व २ आपसी संमतीने लिहून देत आहे.
- पार्टी क्रमांक १ यांचे प्रत्यक्ष मालकीचे व ताब्यातील तालुका जिल्हा --------------- येथे स्थित असलेले पार्टी क्र. 2 यांना खालील अटींवर 11 महिन्यांकरता दिनांक: -----/-----/----- रोजी भाड्याने देत आहे.
- सदर भाडेपट्टी 11 महिने मुदतीकरिता असून त्यानंतर जागेचा ताबा पार्टी क्र. २ दोन्ही कुठल्याही प्रकारे तक्रार न करता पार्टी क्र. 1 यांचे ताब्यात परत देतील.
- सदरहू जागेचे भाडे महिन्याचे ---------------/- रु अक्षरी. --------------- रुपये फक्त असून दर महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या आत घर मालकास देण्यात यावे. सदर जागेचा ताबा आज दिनांक: -----/-----/----- पासून पार्टी क्र. २ यांना मिळाला असे गृहीत धरण्यात येत आहे.
- या घराचे ---------------/- रुपये. अक्षरी --------------- रुपये मात्र डिपॉझिट म्हणून पार्टी क्र. 1 यांनी सदर भाडे जागेचा करारनामा मुदत समाप्तीनंतर ताबा परत करतेवेळी बिनव्याजी रक्कम परत करण्याचे ठरले आहे.
- तसेच पार्टी नंबर २ ला काही कारणास्तव जागा मुदतीपूर्वी खाली करायची असल्यास करार संपण्यापूर्वी व त्यांची मुदत संपण्यापूर्वी एक महिन्याच्या आत ती पार्टी क्र. 1 ला लिखित स्वरूपात कळवेल, पार्टी क्र. 1 त्यांना ताबडतोब डिपॉझिट रक्कम असलेले रुपये --------------- परत करतील.
- तसेच पार्टी क्र. 1 ला काही कारणास्तव घर खाली करून घ्यावयाचे असल्यास करार संपण्यापूर्वी मुदत संपण्यापूर्वी पार्टी क्र. १ पार्टी क्र. २ ला करार संपन्या पूर्वी घराचा ताबा देतील पार्टी क्र. 1 डिपॉझिट स्वरूपात असलेले रुपये --------------- परत करतील.
- सदर घर/गाळा मला पार्टी क्र. 1 ने भाड्याने दिलेले आहे, मी लिहून देतो की घरात/गाळ्यात कुठल्याही प्रकारचा पोट भाडेकरू ठेवणार नाही, जर असे केल्यास माझा भाडेकरूंचा हक्क नाहीसा होईल तसेच पोटभाडेकरू चा घरात कोणताही अधिकार राहणार नाही. तुम्हास पार्टी क्र. १ ला ताबडतोब सदरहू घराचा माझा पार्टी क्र. 2 कडून खाली करून घेण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होईल.
- सदरचा करारनामा फक्त अकरा महिन्यांचा असून त्यानंतर पार्टी नंबर १ च्या परवानगीने घराचा करारनामा वाढवून मिळेल दरवर्षी १० % भाडेवाढ राहील. हा करारनामा त्यानंतर वाढवायची परवानगी असल्यास संपण्याच्या आधी पार्टी क्र. २ ला कुठले प्रकारची तक्रार न सांगता पार्टी क्र. १ चे हक्काने बिनतक्रार घर ताब्यात देण्यात येईल.
- सदर घरात इलेक्ट्रिक्स मीटर लावले असून घराचे येणारे वीज व पाणी बिल हे पार्टी क्र. २ हे नियमित भरतील व भरलेले बिल/ पावती पार्टी क्र. 1 कडे देतील.
- सदर घराचा मूळ स्वरूपात आत मध्ये तसेच बाहेरील स्वरूपात कोणताही बदल करावयाचा असल्यास पार्टी क्र. 2 यांना अधिकार राहणार नाही.
- सदर घराच्या बाहेर स्वरूपात पार्टी क्र. २ कच्च्या/ पक्क्या दोन्ही स्वरूपाचे कोणती बांधकाम करणार नाही तसे केल्यास सदर घराचा करार नामा भंग होईल व करारनामा संपुष्टात येऊन पार्टी क्र. 1 ला घराचा ताबा घेण्याचा अधिकार राहील.
- सदर घर निवासाकरिता घेतलेले आहे पार्टी क्र. 2 यांना तोच वापर करावा लागेल इतर उपयोग करावयाचा झाल्यास पार्टी क्र. १ कडून लिखित परवानगी घ्यावी लागेल.
- जागेचा कर भाडेकरू पार्टी क्र. 2 महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे भरेल.
- पाण्याच्या मोटारच्या दुरुस्तीचा खर्च भागीदारी स्वरुपात राहील.
हा करारनामा पार्टी क्र. 1 क्र. 2 यांनी नीट वाचून समजून राजीखुशीने लिहून दिलेला असून त्यावर दोन्ही साक्षीदार यांनी सही केली आहे, हा करारनामा आम्हाला व आमच्या इस्टेट वारसाच लागू व बंधनकारक असेल.
ठिकाण: --------------- ------------------------------
दिनांक: -----/-----/----- घर मालक सही (लिहून घेणार)
------------------------------
भाडेकरू सही (लिहून देणार)
साक्षीदार
- ------------------------------
- ------------------------------
|