महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर आम्हाला WHATSAPP मेसेज करा.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
वारस नाव दाखल करून घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र
वारस म्हणून नाव दाखल करून घेण्यासाठी अॅफिडेव्हिट
--------------- येथील मी. सि. जज्ज सो. ज्यू. डी. यांच्या कोर्टात रे. दि. मु. नंबर. --------------- श्री. --------------------------------------------- वादी विरुद्ध श्री. --------------------------------------------- प्रतिवाद
अॅफिडेव्हिट
मी, श्री/श्रीमती. --------------------------------------------- वय. --------------- वर्षे, व्यवसाय. --------------- रा. --------------- सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो ते खालीलप्रमाणे. या कामातील वादी नं. २ हि दिनांक. --------------- रोजी मयत झाली असून तिचे वारस या दाव्याचे कामी दाखल होणे गरजेचे आहे.
वादी नं. २ हिचा दावा या कोर्टात न्यायप्रविष्ट असल्याचे तिचे वारसांना माहित नव्हते. त्यामुळे, सदर वारसांना याकामी वादी नं. २ मयत झाल्यानंतर मुदतीत वारस म्हणून सामील होता आले नाही. अलीकडेच म्हणजे दिनांक. --------------- रोजी याकामातील वादी नं. १ व प्रतिवादी नं. १ ते ५ यांची याकामात कोर्टाबाहेर तडजोड झाल्याचे वादी नं. २ च्या वारसांना समजले. त्यावरून सदराचा दावा न्यायप्रविष्ट असलेचे वादी नं. २ चे वारसांना समजले.
वादी नं. २ यास खालील प्रमाणे वारस आहेत.
वरील प्रमाणे वादी नं. २ यांचे वारस असून हे तिन्ही वारस आज रोजी मे. कोर्टात हजर होत आहेत. तरी, मे. कोर्टाने वादी नं. २ च्या वारसांना याकामी हजर होण्यास झालेला --------------- महिने व ---------------दिवसांचा विलंब माफ करून मयत वादी नं. २ --------------------------------------------- हिचे नाव कमी करून त्या जागी मयत वारस म्हणून वरील ३ वारसांची नावे वादी नं. २ चे जागी समाविष्ट करण्याची परवानगी द्यावी.
येणे प्रमाणे अॅफिडेव्हिट केले असे.
ठिकाण: दिनांक: वादी
प्रतीज्ञालेख
मी, श्री/श्रीमती. --------------------------------------------- वय. --------------- वर्षे, व्यवसाय. --------------- रा. --------------- सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की वर अॅफिडेव्हिट मधील संपूर्ण मजकूर खरा व बरोबर असून त्याच्या सत्यतेसाठी मी याखाली --------------- मुक्कामी सही केली.
ठिकाण: दिनांक: अॅफियंट
मी अॅफियंट यास ओळखतो.
|