कुंटुब कर्त्याचे प्रतिज्ञापत्र
मी श्री/श्रीमती. --------------- --------------- --------------- वय. --------------- धंदा. --------------- राहणार. --------------- पो. --------------- ता. --------------- जि. -------------- हे प्रतिज्ञापत्र करित आहे.
- मी माझ्या हिंदू एकत्र कुटुंबाचा कर्ता असून, त्या कुटुंबाचे, मी माझी पत्नी, मुलगा, चि. --------------- --------------- --------------- व मुलगी कु. --------------- --------------- --------------- असे घटक आहेत. माझी आणखी एक मुलगी सौ. --------------- --------------- --------------- हिचे, नुकतेच लग्न होऊन ती तिच्या सासरी गेली आहे.
- माझ्या कुटुंबाची एक स्थावर मिळकत --------------- येथे आहे, तिचे सविस्तर वर्णन खालील परिशिष्टात दिले आहे. त्या मिळकतीचे घर फार जुने झाले आहे व त्यात भाडेकरू राहतात. ती मिळकत मी एका प्रवर्तकाला विकासासाठी विकत देण्याचे ठरविले आहे व सदर प्रवर्तकाने सदर मिळकत विकण्याची कौटुंबिक गरज काय आहे, अशी माहिती मागीतली आहे. त्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करत आहे.
- माझी कौटुंबिक आर्थिक स्थिती चांगली नाही. काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मुलाचे लग्न झाले आहे. त्या लग्नसमारंभाकारिता व देण्या-घेण्यासाठी, मला लोन काढावे लागले होते. ते रक्कम / अक्षरी --------------- इतके लोन अजून फेडावयाचे आहे. शिवाय माझी दुसरी मुलगी सदर कु. --------------- --------------- --------------- हिचा विवाह करून देण्याचा विचार आहे व त्याकरिता मला पैशांची गरज आहे. माझे दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत व त्याकरिता बराच खर्च करावा लागत आहे.
- सदर मिळकत विकून जि किंमत मला मिळणार आहे, टी चांगली व बाजारभावाला धरून आहे, सदर पैशातून, मी राहीलेले लोन फेडू शकतो व माझ्या दुसस्या मुलीच्या विवाहाचाही खर्च करू शकतो . जी शिल्लक राहील त्याच्या व्याजावर माझा कौटुंबिक खर्च भागू शकेल, अशी माझी खात्री झाली आहे.
- सदर मिळकतीचे जे भाडे येते, त्यातून मिळकतीचा खर्च वजा जाता, उत्पन्नातून शिल्लक फारशी राहात नाही. शिवाय जे घर आहे, ते फार जुने झाले आहे व त्याच्या दुरूस्तीचा वारंवर खर्च करावा लागतो. तसेच आता ती मिळकत ठेवणे तितकेसे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नाही. अशी माझी खात्री झाली आहे.
- म्हणून मी वरील मिळकत विकणे गरजेचे झाले आहे व माझ्या कुटुंबाच्या हिताचेही आहे. तसेच, मी माझ्या कुटुंबाचा कर्ता असल्यामुळे वरील मिळकत विकण्याचा मला हक्क आहे.
ठिकाण:
दिनांक:
वरील उल्लेखिले परिशिष्ट
येणे प्रमाणे मी श्री / श्रीमती. --------------- --------------- --------------- हे प्रतिज्ञापत्र शपथेवर करत आहे.
सही, दिनांक
निवेदक
(--------------- --------------- --------------- )
|