महत्वाचे
महाराष्ट्र मधील सर्व सेतू / आपले सरकार सेवा केंद्र / महा ऑनलाईन केंद्र / डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी व झेरॉक्स दुकानदार आणि इतर केंद्र चालकांसाठी महत्वाचे असलेले सर्व अर्ज आम्ही PDF स्वरुपात तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
तुम्हाला जर या अर्जाची WORD FILE पाहिजे असेल तर WWW.SUYOMS.COM या वेबसाईट वरून आपण ती सशुल्क डाऊनलोड करू शकता.
सूचना: मुख्य पेज वर तुम्हाला जो अर्ज नमुना दिसेल व आपण जी PDF डाउनलोड करणार आहोत ती संबंधीत अधिकारी यांच्या कडून चौकशी करूनच अर्ज नमुने वापरावेत.
शॉप लायसन्स साठी स्व:घोषणापत्र
|
स्वघोषणापत्र
मी/आम्ही, याद्वारे गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो/ करते आणि असे नमून करतो/ करते की, मी/आम्ही सुरु केलेल्या व्यवसायावर कोणताही अधिनियम, नियन, कायदा किंवा कोणत्याही विधि न्यायालयाचा अथवा कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याचा आदेश याद्वारे बंदी घालण्यात आलेली नाही किंवा मनाई करण्यात आलेली नाही आणि मी/ आम्ही ज्या जागेत उक्त व्यवसाय करीत आहे आहोत तेथे कोणताही अधिनियम, नियम, कोणत्याही न्यायालयाचा अथवा कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याचा आदेश यांचे उल्लंघन झालेले नाही.
मी/ आम्ही, याद्वारे असे घोषित करतो/ करते की, वर अर्जामध्ये नमूद केलेली माहिती, माझ्या आमच्या वैयक्तिक ज्ञानानुसार, माहितीप्रमाणे व विश्वासानुसार खरी व बिनचूक आहे. चुकीची माहिती देण्याच्या परिणामाची मला/ आम्हाला पूर्ण जाणीव आहे. दिलेली माहिती चुकीची आढळून आल्यास मी/आम्ही भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) अन्वये किंवा त्यासंबंधात लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये खटला भरण्यासाठी व शिक्षेसाठी पात्र आहे/ आहोत. मी/आम्ही, अर्जात नमूद केलेल्या जागेत व्यवसाय करण्यासाठी संबंधित समुचित प्राधिकाऱ्याकडून आवश्यक ती अनुज्ञप्ती, परवानगी, परवाना प्राप्त केला आहे. मी/आम्ही, अनुज्ञप्ती, परवानगी, परवाना न घेता व्यवसाय करीत असल्यास कायदेशीर कारवाईसाठी पात्र व जबाबदार राहू. मी/आम्ही,असे घोषित करती/ करते की, भारतातील लागू असणाऱ्या कायद्यांतर्गत मनाई असलेले बेकायदेशीर कृत्य अथवा व्यवसाय करणार नाही. मी/आम्ही, असे घोषित करतो/करते की, जेथे असा व्यवसाय सुरु करण्यास किंवा चालविण्यास कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशाद्वारे मनाई केलेली आहे त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये माझे/आमचे व्यवसायाचे ठिकाण स्थित नाही. मी/आम्ही, असे घोषित करतो/करते की, अर्जासोबत सादर केलेल्या स्वयं-साक्षांकित दस्तऐवजाच्या प्रती या मूळ दस्तऐवजच्या सत्यप्रती आहेत. या प्रती असत्य किंवा बनावट असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) आणि / किंवा त्यासंबंधात लागू असलेल्या कोणत्याही इतर कायद्यान्वये माझ्या/आमच्या विरुद्ध न्यायालयीन खटला भरण्यासाठी व शिक्षेसाठी मी / आम्ही पात्र आहे/ आहोत याची मला/आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मी/आम्ही, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ (२०१७ चा ६१) व त्या अंतर्गत तयार केलेल्या नियमांतील तरतुदींचे आणि सक्षम प्राधिकारी यांचेकडील निर्गमित करण्यात आलेले आदेश यांचे पूर्णत: पालन करण्याची हमी देतो/देते.
नियोक्त्याचे नाव आणि स्वाक्षरी |
👇🏻 PDF file Download 👇🏻
सर्व प्रकारच्या अर्जांची WORD File डाऊनलोड करण्यासाठी WWW.SUYOMS.COM या वेबसाईटला भेट द्या.
